Home संगमनेर संगमनेरच्या व्यक्तीकडून जात पडताळणी समितीची फसवणूक

संगमनेरच्या व्यक्तीकडून जात पडताळणी समितीची फसवणूक

Breaking news | Sangamner: एकाचे बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करून ते दुसरे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सादर केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात संगमनेरच्या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

Cheating of the Caste Verification Committee by the person of Sangamner

अहमदनगर: रक्त नातेसंबंधाचा पुरावा म्हणून एकाचे बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करून ते दुसरे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सादर केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात संगमनेरच्या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविशंकर उत्तम अरगडे (रा. अरगडे मळा, कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस नातेसंबंधाचा पुरावा म्हणून दिले बनावट प्रमाणपत्र निरीक्षक स्वाती थोरात यांनी फिर्याद दिली आहे. रविशंकर अरगडे यांनी कुणबी जाती दावा शैक्षणिक प्रकरण १४ जून २०२३ रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते. प्रस्तुत प्रकरणात दाखल पुराव्यांची तत्कालीन समितीने प्रथम छाननी केली असता त्यामध्ये रविशंकर अरगडे याने पुरावा म्हणून निकिता दिलीप अरगडे यांचे कुणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

दरम्यान सदर प्रमाणपत्राची पडताळणी केली असता निकिता दिलीप अरगडे यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेले आढळून आले नाही. त्यामुळे रविशंकर याने बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करून रक्त नातेवाईकांना जात बैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णयाचा लाभ मिळावा आणि समितीने इतर कोणतेही पुरावे सादर करण्याची आवश्यकता असणार नाही असे गृहीत धरून जिल्हा जात पडताळणी समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Cheating of the Caste Verification Committee by the person of Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here