अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल
Ahmednagar, Shirrampur: तु मला खूप आवडतेस, तु माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर जबरदस्ती करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molested).
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरानजीक असलेल्या गोंधवणी परिसरात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत घरात घुसून तिचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका जणाविरुध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
दि. 12 ऑक्टोबर रोजी दु. 3.15 च्या सुमारास 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या राहत्या घरी एकटीच असताना अबरार गुलाब शाह याने घरात अनाधिकृतपणे घुसला व मुलीला म्हणाला की, तू मला खूप आवडतेस, तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर मी तुझ्याबरोबर जबरदस्ती करेल. तेव्हा मुलीने घाबरून त्याला येथून जाण्यास सांगितले नाहीतर घरच्यांना सांगेल, अशी म्हणाली असता अबरारने तिला जवळ ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच घरच्या फोनवरुन त्रास दिला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली असून पोलिसांनी अबरार गुलाब शाह याचेविरुध्द भादंवि कलम 354 अ, 354 ड, 506, 509 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती देवरे हे करत आहेत.
Web Title: case has been registered against one for molested a minor girl