Home संगमनेर संगमनेर ब्रेकिंग: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल

संगमनेर ब्रेकिंग: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Election 2024: आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या  डॉ. जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल.

case has been registered against Jayshree Thorat

संगमनेर: संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या  डॉ. जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. जयश्री थोरात यांच्यासह सुधीर तांबे आणि दुर्गा तांबे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या गुन्ह्यात ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचे आदेश असतानादेखील गर्दी केल्याचे कारणामुळे प्रशासनाने सदर गुन्हा दाखल केला आहे.

जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

आचारसंहिता असताना जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये महिला नेत्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेत बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरांतांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर थोरातांचे समर्थक आक्रमक झाले त्यांनी सुजय विखेंच्या गाड्यांची तोडफोड केली. वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विश्‍वास मुर्तडक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयु थोरात, सुरेश थोरात, राहाता विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे (रा. लोणी), सचिन बडगुजर (रा. श्रीरामपूर), बाबा ओहोळ (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), सीताराम राऊत (रा. संगमनेर),वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, बाळासाहेब गायकवाड (रा. आश्‍वी), हेमंत उगले (रा. श्रीरामपूर), करण ससाणे (रा. श्रीरामपूर), दिपाली करण ससाणे (रा. श्रीरामपूर), अमर कतारी (संगमनेर), अशोक सातपुते (रा. खांजापूर), माधवराव कानवडे (रा. संगमनेर), सचिन खेमनर, इंद्रजित खेमनर (रा. साकूर), राजाभाऊ खरात (रा. घुलेवाडी), सचिन चौघुले (रा. शिर्डी), सचिन दिघे (रा. तळेगाव) आणि यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: case has been registered against Jayshree Thorat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here