Home संगमनेर संगमनेर: पदाधिकारी मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

संगमनेर: पदाधिकारी मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

Breaking News | Sangamner Crime: शहरात भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आता दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद दाखल.

case against two officials in the case of assault

संगमनेर: शहरात भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आता दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान त्र्यंबकेश्वरकडे जाताना संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मंत्री चौहान त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाल्यानंतर काही वेळातच मागील व्यक्तिगत बादातून सुयोग गुंजाळ व राहुल भोईर या दोघांनी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यावरून त्यांनी शनिवारी (दि.४) दुपारी दिलेल्या तक्रारीवरून वरील दोघांवर मारहाण शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आता भाजपचे शहर सरचिटणीस राहुल भोईर व सुयोग गुंजाळ या दोघांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यात गुरुवारच्या केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यक्रमाचा उल्लेख करीत मागील वादाच्या कारणावरून ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत व भाजपचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव वलवे या दोघांनी भोईर व गुंजाळ यांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. सदर प्रकार घडला तेव्हा शिवीगाळ करणारे दोन्हीही पदाधिकारी मद्याच्या नशेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

Web Title: case against two officials in the case of assault

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here