Home संगमनेर संगमनेर बस आगारातून एसटी बाहेर काढताच वाहक कोसळला

संगमनेर बस आगारातून एसटी बाहेर काढताच वाहक कोसळला

carrier collapsed as ST was being taken out of the Sangamner bus

संगमनेर | Sangamner: संगमनेर डेपोत शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या वाहकास कामावर बोलावण्यात आले. बस आगारातून बाहेर काढतानाच त्याची मन:स्थिती बिघडल्याने तो चक्कर येऊन कोसळला. या वाहकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याच्या आईने पोलिस ठाणे गाठून संबंधित अधिकाऱ्यांविरुदध तक्रार केली.

एसटीच्या संपामुळे बसस्थानकात आंदोलन सुरु असल्याने संगमनेर आगारही (Sangamner Bus Depo) बंद आहे. शनिवारी आगारातून बस सोडण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. त्यासाठी सूरज घोलप या वाहकाला कामावर बोलाविण्यात आले होते. मात्र, बस बाहेर काढली जात असतानाच तो चक्कर येऊन पडला.

याबाबत  त्याची आई मनीषा शिवाजी घोलप यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांचे पती एसटीच्या सेवेत होते. त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुलगा सूरज अनुकंपा तत्वावर एसटीत वाहक म्हणून भरती झाला. त्याचे प्रशिक्षण झाल्यापासून तो घरीच होता. त्यावेळी त्याला ड्युटी देण्यात आली नव्हती. आज अचानक त्याला कामावर बोलाविण्यात आले. नोकरी टिकवायची असेल तर कामावर यावे लागेल, असे सांगून एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने कामावर येण्यास भाग पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे. संप सुरू असल्याने कामावर येताना त्याच्यावर प्रचंड दडपण आले. त्यामुळे तो चक्कर येऊन पडला. त्याला रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर एसटीचे अधिकारी तेथून निघून गेले.

Web Title: carrier collapsed as ST was being taken out of the Sangamner bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here