अहमदनगर: कार झाडावर आदळून भीषण अपघात, एकाचा मृत्यू
Ahmednagar News: अज्ञात वाहनाने हूल दिल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
श्रीरामपूर| Shrirampur: अज्ञात वाहनाने हूल दिल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात (Accident) शहरातील छाया सुभाष चुडिवाल (वय 58) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. दि. 17 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर वडाळा महादेव परिसरात हा अपघात झाला.
या अपघातात त्यांचे पती दिगंबर जैन समाजाचे कार्यकर्ते व वीर सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुभाष चुडिवाल बालंबाल बचावले. अपघाताने गाडीच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या. मात्र जोराचा धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. परिसरातील पवार बंधू व नागरिकांनी त्यांना साखर कामगार दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. कामगार हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने व त्यांच्या सहकार्यांनी वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काल मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह हेड कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला तर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
Web Title: Car crashes into tree, fatal accident, one dead
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App