Home अकोले अकोले क्राईम: गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली, एक लाखाचा गुटखा जप्त

अकोले क्राईम: गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली, एक लाखाचा गुटखा जप्त

Akole Crime:  अकोले पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये किमतीचा गुटखा व पाच लाख रुपये किमतीची गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडल्याची कारवाई. (Gutkha worth one lakh seized)

Car carrying Gutkha caught, Gutkha worth one lakh seized

अकोले : अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे शनिवारी अकोले पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये किमतीचा गुटखा व पाच लाख रुपये किमतीची गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे.  एकूण सहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस नाईक शेरमाळे यांच्या फिर्यादीवरून सागर रमेश नाईकवाडी (वय २९ रा. धामनगाव पाट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ९६ हजार रुपये किमतीचे हिरा पान मसाला असे नाव असलेले गुटख्याच्या ८ गोण्यांमध्ये ८०० पुडे, तर २४ हजार रुपये किमतीचे रॉयल ७१७ असे नाव असलेली सुगंधित तंबाखूच्या ८ गोण्यांमध्ये ८०० पुडे. हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर रमेश नाईकवाडी हा टाटा सुमो गाड़ी नंबर (एम एच १२ जी ई ३३१०) मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल, असा खाद्य पदार्थ हिरा पान मसाला खाल्ल्यास अपायकारक आहे. हे माहीत असताना विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या राहत्या घरासमोर धामनगाव पाट येथे टाटा सुमो गाडीमध्ये घेऊन थांबला होता. सव्वासहाच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून गाडीतील इसमास ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीच्या आधारे पोलिस नाईक विठ्ठल शेरमाळे, अनिल जाधव, महेंद्र गुंजाळ, चालक सोमनाथ पटेकर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Car carrying Gutkha caught, Gutkha worth one lakh seized

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here