Home अहिल्यानगर द बर्निंग कार, शिर्डीकडे जात असताना भाविकांच्या गाडीने घेतला अचानक पेट

द बर्निंग कार, शिर्डीकडे जात असताना भाविकांच्या गाडीने घेतला अचानक पेट

Ahmednagar Burning Car: तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शिर्डीकडे जात असताना पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाटा येथे वॅगनर कारने अचानक पेट घेतल्याची घटना.

Burning Car, a car of devotees caught fire suddenly while on its way to Shirdi

पाथर्डी: रायगड  जिल्ह्यातील चार भाविक तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शिर्डीकडे जात असताना पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाटा येथे वॅगनर कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये भाविकांची 40 हजार रुपयांची रोकड आणि 20 हजार रुपयांचा मोबाईल जाळून खाक झाला. तर जळालेल्या कारच्या सुट्ट्या भागाची आज्ञातांकडून चोरी करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत जाधव, अमित पुजारी, महेंद्र नमसोले, सुशांत घोडेकर (सर्व रा. गोंधळपाडा, ता. आलिबाग, जिल्हा रायगड) हे मारुती सुझुकी वॅगनर क्रमांक (एमएच 06 सीडी 6012) या कारने शुक्रवारी तुळजापुरवरुन शिर्डीकडे (Shirdi) दर्शनाला जात होते. पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्या जवळ विश्वविनायक लॉन्स समोर गाडीतुन अचानक धुर निघायला लागला. त्यावेळी गाडी थांबुन गाडीतून सर्व जण बाहेर पडताच गाडीने पेट घेतला.

आगीने रौद्र रूप धारण केल्याने कार जाळून खाक झाली आहे. यामध्ये संबंधित प्रवाशांची चाळीस हजार रोख रक्कम आणि स्मार्ट मोबाईल जळून खाक झाला.घटनेची माहिती मिळताच पाथर्डी नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आप्पासाहेब वैद्य, संदीप बडे, संजय बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान गाडी जळाल्यानंतर  पहाटे तीन वाजता सर्वजण गाडीपासुन थोड्या अंतरावर झोपी गेले. शनिवारी (दि 24) सकाळी 6 वाजता जळालेल्या गाडीचे व्हील, गॅस किट, दरवाजे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अभिजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Burning Car, a car of devotees caught fire suddenly while on its way to Shirdi

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here