Home क्राईम धक्कादायक! भर रस्त्यात प्रहार पक्षाच्या नगरसेवकाची निर्घृण हत्या

धक्कादायक! भर रस्त्यात प्रहार पक्षाच्या नगरसेवकाची निर्घृण हत्या

Yavatmal Crime News :  यवतमाळ मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रहार पक्षाच्या नगरसेवकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या (Murder), मित्रानेच चाकूने वार करून गावंडे यांची हत्या, पोलिसांनी तिघांना अटक केली.

Brutal Murder of Prahar party corporator on Bhar road

यवतमाळ: यवतमाळ मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बाभूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे रेती व्यवसायीक तथा प्रहार पक्षाच्या नगरसेवकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात केल्याची घटना घडली आहे.  अनिकेत गावंडे असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. रेती व्यवसायातील भागीदार असलेल्या मित्रानेच चाकूने वार करून गावंडे यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सड्डू उर्फ सादीकमुल्ला सलीम मुल्ला ( वय, 27),  गोलू उर्फ समीरमुल्ला सलीममुल्ला ( वय, 25) आणि सोनू उर्फ आबीदमुल्ला सलीममुल्ला ( वय 22, सर्व रा. मिटनापूर) या तिघांना बाभूळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की,  काल रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान यवतमाळच्या बाबूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे मृत अनिकेत गावंडे याचा भाऊ शुभम गावंडे हा व्यवसायातील पैसे मागण्यांसाठी संशयीत आरोपींकडे गेला होता. यावेळी तेथे जोरदार वादावादी झाली. वाद झाल्यामुळे शुभम गावंडे याने भाऊ अनिकते गावंडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. अनिकेत गावंडे तेथे आल्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. यातूनच संशयीतांनी अनिकेत गावंडे यांच्यावर धारदार चाकूने छातीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनिकेतने रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे त्याचे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले होते.

Web Title: Brutal Murder of Prahar party corporator on Bhar road

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here