अहमदनगर जिल्ह्यातील हा पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला
Ahmednagar: नांदूर मध्यमेश्वर बंधार्यातून गोदावरी नदीपात्रात ४५ हजार ६५४ क्युसेस पाण्याच्या विसर्ग सोडण्यात आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला.
श्रीरामपूर: नाशिक जिल्हयात गंगापूर, धारणासह अनेक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. आज सकाळी ६ वाजता नांदूर मध्यमेश्वर बंधार्यातून गोदावरी नदीपात्रात ४५ हजार ६५४ क्युसेस पाण्याच्या विसर्ग सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुणतांबा येथील काथ नाल्यावर पाणी आले असून पुणतांबामार्गे कोपरगाव व श्रीरामपूरकडे जाणारी वाहतूक सकाळी १० वाजे पासूनच बंद झाली आहे. तसेच १२ वाजेनंतर गोदावरी नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या वंसत बंधार्याच्या पुलावरून पाणी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या औरंगाबाद जिल्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नाशिक जिल्हयात गंगापूर, धारणासह अनेक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जलसेतु (लहान पुल) प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे.
Web Title: bridge in Ahmednagar is under water, communication with villages has been cut off