दहा हजारांची लाच, वजनमापे निरीक्षक सापळ्यात अडकला
Breaking News | Ahmednagar: प्रवरानगर येथील संस्थेकडून दहा हजारांची लाच (Bribe) घेताना श्रीरामपूरचा वजनमापे निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला.
लोणी: भ्रष्टाचार किती बोकाळला आहे याचा अनुभव सोमवारी आला. राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरानगर येथील संस्थेकडून दहा हजारांची लाच घेताना श्रीरामपूरचा वजनमापे निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला.
आ. राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक्स वाहतूक संस्था प्रवरानगर येथे भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप चालवते. पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी लोकसेवक अशोक श्रीपती गायकवाड, वजनमापे निरीक्षक श्रीरामपूर याने बारा हजार रुपयांची मागणी केली. संस्थेचे मॅनेजर यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत सोमवार दि. २९ जानेवारी रोजी तक्रार दिली. तिची तात्काळ दखल घेत या विभागाने प्रवरानगर येथे सोमवारीच सापळा लावला.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
तक्रारदारकडून तडजोड करून पंचासमक्ष दहा हजारांची लाच लोकसेवक गायकवाड याने स्वीकारली आणि सापळा लावलेल्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. नाशिकच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रवी निमसे, सचिन सुदृक, किशोर लाड आणि हारून शेख यांच्या पथकाने सापळा लावून यशस्वी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत आरोपी विरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे भ्रष्टाचार किती बोकाळला आहे हे समोर आले.
Web Title: bribe of ten thousand, weighing inspector got caught in the trap
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study