Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मोटारसायकल घेवून न दिल्याने छातीत चाकू खुपसून मुलाची आत्महत्या

अहिल्यानगर: मोटारसायकल घेवून न दिल्याने छातीत चाकू खुपसून मुलाची आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar Suicide: कॉलेज मुलाने वडिलांकडे दुचाकीसाठी हट्ट धरला, वडिलांनी दुचाकी घेऊन न दिल्याने त्याने छातीत चाकू खुपसून आत्महत्या केली.

Boy commits suicide by stabbing himself in the chest after not getting a motorcycle

नगर : कॉलेज मुलाने वडिलांकडे दुचाकीसाठी हट्ट धरला, वडिलांनी दुचाकी घेऊन न दिल्याने त्याने छातीत चाकू खुपसून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि. २२) रात्री सावेडी उपनगरात घडली.

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऋषभ दीपक भंडारी (वय २०, रा. गोकूळनगर भिस्तबाग चौक, अहिल्यानगर) असे मयत मुलाचे नाव आहे. डॉ. खेडकर यांनी पोलिसांना खबर दिली.

पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी फोनद्वारे कळविले की, मयत ऋषभभंडारी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता, तो गेल्या काही दिवसांपासून वडिलांकडे दुचाकी घेण्यासाठी हट्ट करीत होता. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांना दुचाकी घेता आला नाही. त्यामुळे नाराज होऊन ऋषभ याने गुरूवारी (दि. २२) रोजी रात्री घरी छातीत चाकून मारून घेतले. त्यास उपचाराकामी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारपूर्वीच त्याला मृत घोषीत केले. महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल संजिवनी नेटके गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Breaking News: Boy commits suicide by stabbing himself in the chest after not getting a motorcycle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here