Home नाशिक अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा

Breaking News | Nashik Crime: तेरा वर्षीय बालिकेचे अश्लील फोटो मिळवून तिच्या नातलगांना व्हायरल क धक्कादायक घटना समोर.

Pornographic photos of a minor girl go viral

नाशिक : तेरा वर्षीय बालिकेचे अश्लील फोटो मिळवून तिच्या नातलगांना व्हायरल क धक्कादायक घटना समोर आली. शेजारी राहणाऱ्या 17 ते 18 वयोगटातील संशयिताने हा प्रकार केला असून, याबाबत नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर भागात राहणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेरा वर्षांची पीडिता ही कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर भागात वास्तव्यास होती. तेव्हा संशयित मुलाने तिच्या शेजारी राहण्याचा फायदा घेऊन ओळख वाढविली. त्यानंतर, तिच्याशी ऑनलाइन सोशल मीडियासह स्नॅपचॅटचा वापर करून चॅटिंग सुरू केले. त्यातच तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गोडीगुलाबीने तिचे अश्लील फोटो ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार डिसेंबर २०२४ ते २३ मे २०२५ पर्यंत सुरू होता. त्यातच, पीडित मुलीने अचानक संशयिताशी चॅटिंग करणे थांबविले. त्याचा राग आल्याने त्याने तिचे अश्लील फोटो पीडितेच्या वडिलांच्या मित्रांना व नातलगांना शेअर करून व्हायरल केले. काही तासांनी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर पीडितेसह तिच्या कुटुंबाची पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठून संशयिताच्या स्नॅपचॅटवरील आयडीसह अन्य आवश्यक माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, संशयितावर भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम व बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेचे वडील सरकारी नोकर असून, त्यांची बदली नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक येथे झाली. त्यामुळे पीडितेसमवेतचा हा प्रकार छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथे वास्तव्यास असताना घडला असून, संशयिताचे वय १७ ते १८ असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याबाबतची कागदपत्रे पडताळली जात असून, संशयिताला पकडण्यासाठी सायबर पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहे.

Breaking News: Pornographic photos of a minor girl go viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here