बावीस लाखांचे बोगस खत जप्त; दोघांवर गुन्हा
Breaking News | Nashik Crime: कृषी विभागाचा छापा (Raid), २२ लाख रुपयांचे बाेगस खते हस्तगत.
नाशिक : विल्हाेळी शिवारातील संशयास्पद गाेदामांत (दि. २७) नाशिक तालुका पाेलीस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २२ लाख रुपयांचे बाेगस खते हस्तगत केली आहेत. याबाबत संशयित गोरख उर्फ अंकुश पवार (रा. अंबरनाथ) व प्रकाश मोरे (रा. नाशिक) यांच्यावर खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये तालुका पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील, नाशिकचे विभागीय कृषी संचालक रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथका विल्होळी शिवारातील दोन गाळ्यांमध्ये अवैधरीत्या विनापरवाना खते उत्पादन केले जात असल्याच्या माहिती मिळाली हाेती. त्यानुसार भरारी पथकाने तालुक्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्याशी समन्वय साधून कारवाईबाबत विनंती केली.
त्यानुसार अंमलदार प्रविण दोबाडे, महेश आव्हाड, विक्रम कडाळे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डाॅ. जगन सुर्यवंशी, माेहिम अधिकारी अभिजित जमधडे, कृषीच्या भरारी पथकातील सदस्य जितेंद्र पानपाटील, तालुका कृषी अधिकारी भटू पाटील, कृषी पर्यवेक्षक संजय सानप, राहुल शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, अवैध व विनापरवाना निकृष्ट निविष्ठा उत्पादन करुन शेतकरी व शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: Bogus fertilizer worth twenty two lakhs seized A crime against both Police Raid
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study