Home महाराष्ट्र भाजप आमदार यांचा शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

भाजप आमदार यांचा शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

Breaking News | Kalyan Crime: BJP MLA Ganpat Gaikwad fired at Shiv Sena Shinde group’s city chief and former corporator Mahesh Gaikwad.

BJP MLA firing on former corporator of Shinde group

कल्याण: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे  शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड  यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार केला असल्याची घटना घडली. महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे  वातावरण आहे.

मागील काही काळापासून कल्याण आणि परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय वाद सुरू आहेत. आजही, शुक्रवारी (2 फेब्रुवारी) एका वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात बैठक सुरू होती. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाले. हा वाद वाढल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: BJP MLA firing on former corporator of Shinde group

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here