अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेते माजी नगराध्यक्ष यांना कोरोनाचो लागण
Ahmednagar News Live | Rahuri corona | राहुरी: भाजप युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम कोरोना टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत स्वतः सत्यजित कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार- खासदार कोरोना बाधित झाले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ना.प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे, आ.रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून आता देवळाली नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कदम यांनी सोशियल मेडीयाच्या माध्यमातून म्हंटले आहे की,. माझी कोरोना टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. तब्बेत व्यवस्थित आहे.काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत. सर्वांनी मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा.
Web Title: BJP Leader Satyajit Kadam Corona Positive