धक्कादायक! भाजपा नेत्या नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी
Breaking News | Amravati: नवनीत राणा यांना अत्याचाराची धमकी.
अमरावती – माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अमरावती येथील घरी प्राप्त झालं आहे. नवनीत राणा यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे आता खळबळ उडाली आहे.
“आज दुपारी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतील निवासस्थानी एक निनावी पत्र आलं आहे. हे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव अमीर असल्याचे सांगितलं आहे. हैदराबादमधून त्याने हे पत्र पाठवलं असून त्याचे नातेवाईक दुबई आणि पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख त्याने या पत्रात केला” असल्याचे विनोद गुहे यांनी म्हटलं आहे.
Web Title: BJP leader Navneet Rana threatened with gang violence
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study