चिंचोडी पाटीलमध्ये मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह
अहमदनगर | Bird Flu: नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे काही काही दिवसांपूर्वी कोंबड्या मृत झालेल्या होत्या. त्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून बर्ड फ्लूमुळेच त्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाने खबरदारी म्हणून एक किलोमीटर अंतरावरील २० हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्याबर कार्यवाही करण्यात येईल.
मागील काही दिवसांत निंबळक, मिडसांगवी, आठवड, चिंचोडी पाटील येथे जवळपास पावणे दोनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. तसेच श्रीगोंदे, जामखेड या ठिकाणी वन्य पक्षी मृत्यू आढळून आले होते. श्रीगोंदा तालुक्यात भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला नव्हता. चिंचोडी पाटील मधील मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. या भागात असणाऱ्या २० ते २२ कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची सुरु असून जिल्हाधीकार्यांच्या आदेशाने कोंबड्या मारण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून त्यांची विल्हेवाट कशी लावायची, बर्ड फ्लू पसरू नये यासाठी काय खबरदारी घ्यायची या सुचना आदेशात देणार असल्याची माहिती समजते.
Web Title: Bird flu report of dead hens in Chinchodi Patil