बिग ब्रेकिंग! अजित पवारांना मोठा धक्का, भुजबळांनी दिला राजीनामा
Nashik Breaking Vidhansabha Election | Sameer Bhubal Resign: समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
नाशिक: समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव – मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना समीर भुजबळ यांचा राजीनामा घ्या अशा सुचना केल्या होत्या. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रात आपण नांदगाव निवडणूक का लढणार आहोत याचं कारणही सांगितलं आहे.
समीर भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, “साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पाडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्षापासून बूथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली”.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहेत. नांदगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगावमधील दहशतीचं वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्विकारावा अशी विनंती”.
Web Title: Big shock to Ajit Pawar, Bhujbal resigned
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study