Home अकोले अकोले: बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

अकोले: बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

Akole News:  शेतात गव्हाला पाणी भरत असताना बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला (Bibtya attack).

Bibtya attack on the Farmer, the Atmosphere of fear in the Area

अकोले: तालुक्यातील गर्दणी गावातील कोतलवाडी शिवारात शेतात गव्हाला पाणी भरत असताना सुरेश लहानु चौधरी (वय ३५) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या पायाला बिबट्याचे नख लागून जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान सुरेश चौधरी हे शेतकरी गर्दणी येथील कोतलवाडी शिवारात शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरत होते. अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून त्यांनी पळ काढला. मात्र यावेळी त्याच्या पायाला बिबट्याची नख लागल्याने पायाला जखम झाली. त्यांनी तात्काळ अकोले ग्रामीण रुग्णालयात जावुन जखमेवर पट्टी करुन इंजेक्शन घेऊन उपचार घेतले आहे. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  या परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Bibtya attack on the Farmer, the Atmosphere of fear in the Area

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here