श्रीरामपूर शहरातील भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ, चार जण जखमी
श्रीरामपूर | Ahmednagar: शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोडला आज सकाळी 10:15 ते 10:30 दरम्यान बिबट्याने धुमाकूळ घालत चांगलीच दहशत निर्माण केली. या बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला व पुरुषासह दाेन लहान मुले जखमी झाले आहेत. यामुळे वस्तीतील नागरिकात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
आज सकाळी अचानक मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोडला काही लोकांनी बिबट्या आल्याचे पाहिले. बिबट्याला पहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या दरम्यान बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात एक पुरुष व महिलसह दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत.
बिबट्या शहरात आल्याची माहिती वन अधिकारी गाढे व पवार यांना दिली. बिबट्याला पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सदरची माहिती मिळताच पोलीस आपल्या फौजफाट्यासह हजर झाले. पोलिसांनी जमाव बाजूला करीत असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याने जवळच असलेल्या झुडपात आश्रय घेतला आहे. वन अधिकारी त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याची माहिती गाढे यांनी दिली.
Web Title: Bibatya roam the city shrirampur Ahmednagar