संगमनेर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा, ग्रामस्थ भयभीत
Sangamner | संगमनेर | घारगाव: संगमनेर तालुक्यातील बोरबन (सराटी) परिसरात टेकडवाडी लोक वस्तीवर जमिनीला अचानक भेगा पडल्याचे निदर्शनास आल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
तालुक्यातील बोरबन (सराटी) टेकडवाडी येथे देविदास गाडेकर, अनिल गाडेकर, नवनाथ गाडेकर, शांताराम गाडेकर, शिवाजी गाडेकर, सोमनाथ गाडेकर, अनंथा गाडेकर आदींसह ग्रामस्थ येथे राहतात. आजूबाजूला डोंगर व नदीपात्र काहीच अंतरावर आहे. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहे.
आज (बुधवारी ३० ) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे. याबाबत बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनास माहिती दिली आहे. तलाठी दादा शेख व कोतवाल शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत नाशिकच्या मेरी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी व भूजल संरक्षण विभागाशी संपर्क केला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. – अमोल निकम , तहसीलदार ,संगमनेर
Web Title: Bhega fell to the ground in Sangamner