Home अकोले भंडारदरा व निळवंडे, आढळा धरणांची पाण्याची स्थिती काय आहे जाणून घ्या

भंडारदरा व निळवंडे, आढळा धरणांची पाण्याची स्थिती काय आहे जाणून घ्या

Bhandardara, Nilwande, Adhala Dam water Situation: आढळा धरण आज-उद्या ओव्हरफ्लो होण्याची शक्यता.

Bhandardara

अकोले: भंडारदरा धरण पाणीसाठा ५५ टक्क्यावर गेला आहे. निळवंडे धरण ६० टक्के भरले आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल रात्री आठ वाजता 5009 दलघफू झाला होता.

अजूनही पाणलोटक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 336, निळवंडेत 299 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. आठ दिवसांत भंडारदरात 3686 दलघफू नवीन पाणी आले. काल बुधवारी दिवसभरात भंडारदरात 57 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पाणलोटात पाऊस सुरू असल्याने नवीन पाण्याची आवक सुरू असून अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील सोळा गावांचे भवितव्य अवलंबून असणारे आढळा धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल बुधवारी सकाळी पाणीसाठा 820 दलघफू होता. त्यात आणखी वाढ होत तो सायंकाळी 861 दलघफू (81.23 टक्के) झाला होता. पावसाचा जोर टिकून राहिल्यास हेही धरण आज-उद्या ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bhandardara, Nilwande, Adhala Dam water Situation Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here