Home अकोले जोरदार पाऊस! भंडारदरा, मुळा, निळवंडे धरण भरले इतके टक्के

जोरदार पाऊस! भंडारदरा, मुळा, निळवंडे धरण भरले इतके टक्के

Breaking News | Ahmednagar Dams: मुळा धरण ५३ टक्के भरले; पूर ओसरला जोरदार पाऊस : कोतूळ येथून ११ हजार १५२ क्यूसेकने आवक.

Bhandardara, Mula, Nilwande dams are filled to such a percentage

राजूर : दक्षिण नगर जिल्ह्याचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे मुळा धरण शुक्रवारी १३ हजार ७१५ (५३ टक्के) भरले. दोन दिवसांपासून मुळा नदीला आलेला पूर ओसरला असून कोतुळ येथून धरणाकडे ११ हजार १५२ क्यूसेकने आवक सुरू आहे. दैनंदिन सरासरी १० हजार क्यूसेकने आवक सुरू राहिल्यास २० ऑगस्टपर्यंत धरण भरेल. असा अंदाज असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील व धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा १३ हजार ७१५ दशलक्ष घनफूटांवर पोहोचला आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये ३ हजार ७६२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. २१ जुलैपासून धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.२६) सकाळी सहा वाजता  भंडारदरा ८०, निळवंडे ४२ टक्के.

आज सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला तर निळवंडे धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांहून अधिक झाला. भंडारदार धरणातील पाणीसाठा ८ हजार ९२३, तर निळवंडेतील साठा हजार ५१८ द.ल.घ.फू. इतका झाला होता. मुळा नगर येथे आतापर्यंत २९२ तर अकोले येथे २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: Bhandardara, Mula, Nilwande dams are filled to such a percentage

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here