Bhandardara Dam: भंडारदरा धरण ९१ टक्के तर निळवंडे ७० टक्के
अकोले | Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरु असल्याने भंडारदरा ९१.६० टक्के तर निळवंडे धरण ७०.७८ टक्के भरले आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने जास्त पाउस होत असल्याने सद्यस्थितीत पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरु आहे.
सद्यस्थितीत जलाशय परिचालन सूचीनुसार निर्धारित पाणीसाठा राखण्यासाठी ८३५ क़ुसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेले पर्जन्यामान असेच सुरु राहिल्यास जलाशय परिचालन सूचीनुसार निर्धारित पाणी पातळी राखण्यासाठी आवश्यकतेनुसार सांडव्याद्वारे दिनांक १६ ऑगस्ट रोजी पाणी सोडावे लागण्याची शक्याता आहे. तरी कृपया धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये असे आवाहन इंजिनियर हरीश चकोर यांनी केले आहे.
Web Title: Bhandardara dam is 91 percent and Nilwande is 70 percent
Get See: Latest Marathi News