Breaking News | Bhandardara: ७ हजार ४२० क्युसेकने विसर्ग सुरू, निळवंडे धरणातही ६० टक्क्याहून अधिक पाणीसाठा.
राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण शुक्रवारी सायंकाळी भरले. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणलोट क्षेत्रात अनेकदा पावसाची संततधार सुरू होती. २४ जुलै रोजी पाणलोट क्षेत्रास अतिवृष्टीचा तडाखा बसला होता तर, दुसऱ्याच दिवशी २५ जुलै रोजी पाणलोट क्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातला होता. २५ जुलै रोजी तब्बल ३४२ तर रतनवाडी व पांजरे येथे अनुक्रमे ३२६ आणि ३१५ मिलीमीटर पाऊस कोसळला होता. यामुळे या परिसरातील ओढ्या नाल्यांनाही मोठा पूर आला होता आणि धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक झाली.
२१ जुलै ते २ ऑगस्ट या बारा दिवसांत धरणात मोठ्या प्रमाणात म्हणजेच ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली होती. तर यावर्षी पावसाचे आगमन २५ जुलै रोजी धरणातून वीज निर्मितीसाठी ८३० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. ३१ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता धरणातील पाणीसाठा दहा हजार दलघफूहून अधिक झाल्यानंतर धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या स्पिलवे गेटमधून प्रथमच ६०९ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. एक ऑगस्ट रोजी या विसर्गात वाढ करण्यात आली होती.
भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्यामुळे आता निळवंडे धरणातील पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सायंकाळी यातील पाणीसाठा ६० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ४ हजार ७११ दलघफू इतका होता.
Web Title: Bhandardara dam filled, water inflow continues
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study