अकोले: शंभर वर्षापुर्वीचे भंडारदरा धरण २५ वर्षानंतर रिकामे
राजूर: भंडारदरा धरणाच्या तळाशी बसविलेल्या दोन मोर्यांच्या झडपांची आतील बाजूने पाहणी करण्यात येणार असल्यामुळे गुरुवारपासून धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पंचवीस वर्षानंतर भंडारदरा धरण रिकामे झाले आहे. आता दुरुस्तीचा निर्णय होणार आहे. भंडारदरा धरणांतील पाणी निळवंडे धरणात साठविण्यात आले आहे. भंडारदरा धरणाच्या कामास १९१० मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी पाणी सोडण्यासाठी बसविलेल्या मोऱ्यांच्या झडपा इंग्लंडहून बोटीने मुंबईला आणल्या गेल्या होत्या. त्यानंतर व्हॉल्व तयार करण्यात आले. ते ११६ वर्षांपूर्वी तयार केले होते. ५० आणि १०० फुटांवर बसविलेल्या या झडपांची नेमकी काय स्थिती आहे पाहण्यासाठी पंधरा वर्षापूर्वी पाणबुड्यांच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली होती.त्यावेळी या झडपांमध्ये बसविलेल्या रॉडची जाडी काहीशी कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
सध्या भंडारदरा धरणात जलसाठा शून्य टक्के आहे. ३०० दशलक्ष घनफूट मृतसाठ्यातील २४ दशलक्ष घनफूट पाणी वॉल्व्ह दुरुस्तीसाठी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे ते पाणी निळवंडेत गेले. सध्या धरणात मृतसाठ्यातील २७६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. ५० फुटावरील मोरीच्या पातळीपर्यंत पाणी सोडण्यात आल्याने धरण पूर्ण रिकामे झाले आहे.
Website Title: Bhandardara dam after 25 years empty