भंडारदरा धरण भरले | ओव्हरफ्लो
भंडारदरा : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. आज दुपारी बारा वाजता १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने भंडारदरा तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे अधिकृत जाहीर केले.
You May Also Like: Shahid Kapoor wife age | Mira Rajput
यावर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीसाठा ३ हजार १९९ दशलक्ष घनफुट इतका होता. पाणलोट क्षेत्रात जूनमध्ये पावसाचे आगमन झाले. दुस-या आठवड्यानंतर धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली. जुलैच्या दुस-या आठवड्यात या परिसराला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. यानंतर पावसाचे प्रमाण वाढत राहिले. जुलैच्या दुस-या आठवड्यानंतर तर या परिसराला तीन वेळा अतिवृष्टीचा तडाखाही बसला होता. धरण ८६ टक्के भरल्यानंतर आणि पावसाचा वाढता जोर पाहून २१ जुलै रोजी सायंकाळपासून धरणाच्या स्पिलवे गेटमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र चार दिवसानंतर पावसाचा जोर कमी होत गेला आणि पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले. मागील आठवड्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने धरणातील पाणी पातळी वाढत गेली. धरणातील पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफुट झाल्यानंतर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभाग जाहीर करत असते. अखेर आज (रविवारी) दुपारी बारा वाजता ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट क्षमता असणा-या या धरणातील पाणीसाठा १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाला. धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जाहीर केले. उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, सहाय्यक अभियंता कांबळे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.