Home बीड पंकजा मुंडेंच्या विरोधात कोण फुंकणार ‘तुतारी’?

पंकजा मुंडेंच्या विरोधात कोण फुंकणार ‘तुतारी’?

Breaking News | Beed Loksabha Election Candidate: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांची उमेदवारी जाहीर.

Beed Lok sabha Election Candidate Opposite Pankaja Mundhe

बीड : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे; परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही.

ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे; परंतु उमेदवारासाठी पक्षातील सोडून बाहेरच्याच उमेदवारांची जास्त चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी आहे. दोन दिवसांत उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता असून, ‘तुतारी’ कोण फुंकणार? याकडे लक्ष लागले आहे.

१९५२ ते २०१९ पर्यंतच्या १८ लोकसभा निवडणुकांमध्ये सातवेळा भाजपने बाजी मारलेली आहे. २०१९ मध्ये विक्रमी मतांनी विजयी झालेल्या डॉ. प्रीतम मुंडे या २०२४ मध्ये हॅट्ट्रिक साधण्यास सज्ज होत्या; परंतु पक्षाने त्यांच्याच ज्येष्ठ भगिनी पंकजा यांना उमेदवारी दिली.

ही नावे चर्चेत…

शरद पवार गटातील डॉ. नरेंद्र काळे, सुशीला मोराळे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, रविकांत राठोड, साहेबराव दरेकर, गंगाभीषण थावरे, प्रा. ईश्वर मुंडे, डॉ. ज्योती मेटे, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक बजरंग सोनवणे.

Web Title: Beed Lok sabha Election Candidate Opposite Pankaja Mundhe

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here