Sangamner Crime News: वाळूच्या कारणावरून महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग (Molested) केल्याची घटना.
संगमनेर: वाळूच्या कारणावरून महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. काल दुपारी तालुक्यातील कासारा दुमाला परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कासारा दुमाला येथे राहणारी महिला तिच्या घरासमोर असताना गावातीलच काहीजण तेथे आले. तुम्ही सकाळीच आमची वाळू घेतली आहे, आता का परत आले अशी विचारणा सदर महिलेने सुरेश मधुकर रुपवते याच्याकडे केली. अशी विचारणा करणारे तुम्ही कोण आहात ? असा सवाल रूपवते याने केला. यावेळी सदर महिलेला रुपवते याने शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर काही जणांनी या महिलेच्या घरात घुसून तिच्या छातीवर लाथा मारून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी एकाजणाने सदर महिलेच्या डोक्यात व तोंडावर हाताने मारहाण केली आहे.
याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरेश मधुकर रूपवते, मयुर राजेंद्र रुपवते, सनी सुरेश रुपवते, ललिता राजेंद्र रुपवते, नेहा सुरेश रुपवते सर्व रा. कासारा दुमाला यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, ३५४, ४२७, ४५२, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करत आहेत.
Web Title: Beating and molested a woman
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App