Home पुणे बाप्पा पावणार अन वरुणराजा बरसणार, राज्यात जोरदार पावसाची शक्यता

बाप्पा पावणार अन वरुणराजा बरसणार, राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Rain Alert: बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय.

Bappa will rain and Varunaraja will rain, there is a possibility of heavy rain

पुणे : गणरायाच्या आगमनाला जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र , काही भागात हलक्या सरी कोसळल्या. जोरदार पाऊस मात्र झाला नाही. पण, येत्या दोन दिवसांत पुण्यासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. बाप्पाच्या आगमनामुळे तरी वरूणराजा प्रसन्न होईल आणि जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगल्या पावसाची आशा पल्लवीत झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून पुण्यासह घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. त्यानंतर लगेच कडक ऊन पडत असल्याने जणूकाही ऊन- पावसाचा लपंडावच सुरू असल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. येत्या आठवडाभर पुण्यात आकाश ढगाळ राहणार असून, सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे..

पुण्यात आतापर्यंत सरासरी ५३८.९ पावसाची नोंद होत असते. परंतु,  यंदा केवळ ३३४ मिमी. पाऊस झाला आहे. ज्याचा परिणाम जलसाठ्यावर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्यासह पुणेकरांनी नजीकच्या भविष्यात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. मात्र बाप्पाच्या आगमनामुळे तरी वरूणराजा पुणेकरांना पावेल आणि पुणेकरांची पाण्याची समस्या मिटेल आशा आहे.

Web Title: Bappa will rain and Varunaraja will rain, there is a possibility of heavy rain

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here