Home नाशिक क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बँक कर्मचाऱ्यावर हल्ला, त्यांचा मृत्यू

क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बँक कर्मचाऱ्यावर हल्ला, त्यांचा मृत्यू

Breaking News | Nashik Crime: किरकोळ कारणावरून बँक ऑफ बडोदामधील कर्मचारी यांच्यावर क्रिकेट खेळण्याच्या बॅटने डोक्यात चार-पाच वार करून हल्ला करण्यात आल्याची घटना. उपचारादरम्यान मृत्यू (Dies).

Bank employee attacked with cricket bat, dies

नाशिक: जुने नाशिक भागातील नाईकवाडी पुरा छपरीची तालमीच्या मागे चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून बँक ऑफ बडोदामधील कर्मचारी जितेंद्र गुलाबसिंग ठाकूर यांच्यावर क्रिकेट खेळण्याच्या बॅटने डोक्यात चार-पाच वार करून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. तसेच या हल्ल्यात त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगा विनायक यांनाही जबर मारहाण करण्यात आली होती.

त्यानंतर जितेंद्र ठाकूर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू (Death) झाला. सदर मयत हे नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष डॉ वसंत ठाकूर यांचे मोठे बंधू होते.तसेच हल्ला करणाऱ्यांविरोधात तात्काळ भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान,यानंतर पोलिसांनी सनी मोजाड, राजेंद्र मोजाड व बंटी चव्हाण या हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते.हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यातील काही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे सांगितले. तसेच या प्रकरणात तपासासाठी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: Bank employee attacked with cricket bat, dies

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here