प्लास्टिकप्रमाणेच फटाक्यांवर बंदी घाला: सत्यजित तांबे
संगमनेर: राज्यात फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे अशी मागणी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. त्यांनी एका टीव्ही चॅनेल मुलाखतीत व्हिडियो प्रकाशित करून मागणी केली आहे.
राजस्थान, नवी दिल्ली, बंगाल या सर्व राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय त्या राज्यसरकारने घेतला आहे. खर पाहिलं तर फटक्यांमुळे प्रदूषण, धूर, आवाज मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून सत्यजित तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती केली आहे की, महाराष्ट्रात देखील त्यांनी जास्त धूर होणारी, जास्तीच्या आवाजाची फटाक्यांवर बंदी आणली पाहिजे, तसेच कायमची बंदी आणली पाहिजे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग सहभागी असेल, अनेक लोकांनी माल घेतला असेल, परंतु पुढील सात पिढ्यांचा विचार करून सध्या थोडे नुकसान झाले तरी चालेल परंतु येणाऱ्या पिढ्यांसाठी ही फटाक्यांवरची बंदी आलीच पाहिजे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ban on firecrackers Satyajeet Tambe