Home अहमदनगर बाळासाहेब थोरातांनी मागणी केली अन..मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच केली

बाळासाहेब थोरातांनी मागणी केली अन..मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच केली

Sangamner News:  दिंडीत ट्रक घुसला. त्यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच, जे वारकरी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार. (Eknath Shinde)

Balasaheb Thorat demanded and the Chief Minister announced directly

संगमनेर:  कार्तिकी वारीसाठी आळंदीकडे निघालेल्या शिर्डीतील वारकऱ्यांच्या दिंडीत संगमनेर तालुक्यात ट्रक घुसला होता. त्यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर दहा वारकरी जखमी झाले होते.

हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत वारकऱ्यांना मदत देण्याबाबतची घोषणा करावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की,  कार्तिकी वारीसाठी शिर्डीचे वारकरी आळंदीकडे निघाले होते. संगमनेर तालुक्यातील घारगावमधील खंदरमाळ येथे त्या दिंडीत एक ट्रक घुसला. त्यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर दहा वारकरी गंभीर जखमी झाले.

त्या वारकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आलो आहे. काहींच्या घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय हादरून गेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या मदतीची घोषणा करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

आमदार थोरात यांनी मागणी करताच मुख्यमंत्री शिंदे यांनी उठून मदतीची घोषणा केली. बाळासाहेब थोरात यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. आळंदीकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक ट्रक घुसला. त्यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच, जे वारकरी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Web Title: Balasaheb Thorat demanded and the Chief Minister announced directly

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here