Home महाराष्ट्र Balaji Tambe: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

Balaji Tambe: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

Balaji Tambe Passes away

Balaji Tambe: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे ८१ वर्षी निधन झाले. मागील आठवड्यात प्रकृती खालाविल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचं महत्व पटवून दिलं. त्यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार मराठी, गुजराथी, इंग्रजी या भाषेत पुस्तक लिहिले होते. त्यांच्या आयुर्वेद उपचारांना देश विदेशात मागणी होती. सकाळ वृत्तपत्र सोबत ते काम करीत होते. फॅमिली डॉक्टर हे त्यांचे सदर विशेष गाजले.

Web Title: Balaji Tambe Passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here