Home संगमनेर संगमनेर धांदरफळ घटनेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

संगमनेर धांदरफळ घटनेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

Breaking News | Sangamner: माजी खासदार सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील सभेत वसंतराव देशमुख यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अश्लाघ्य वक्तव्य.

Bail granted to Congress workers in Sangamner Dhandarphal 

संगमनेर:  माजी खासदार सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील सभेत वसंतराव देशमुख यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अश्लाघ्य वक्तव्य केले होते. त्यानंतर या सभेवरून परतणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांवर चिखली व परिसरात थोरात समर्थक कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला व गाड्यांची जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेसच्या तब्बल २५ कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ऐन दिवाळी या कार्यकर्त्यांना संगमनेर सोडून बाहेर रहावे लागले. त्यातच तीन कार्यकर्त्यांना दिवाळीत पोलीसांनी अटक केली होती. तर काल येथील न्यायालयाने २२ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

डॉ. सुजय विखे यांच्या सभा स्टेजवर महिलांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोलले गेल्याने थोरात समर्थक कार्यकर्ते प्रचंड संतापले होते. त्यातूनच सभा संपल्यानंतर रस्त्यात हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काही गाड्यांच्यी तोडफोड झाली तर एका गाडीची जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी अशोक वालझाडे, यांच्यासह काही जणांनी फिर्याद देत बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंद्रजीत थोरात, स्विय सहाय्यक भास्कर खेमनर, सुरेश थोरात, सुभाष सांगळे, शाबीर तांबोळी, सिद्धार्थ थोरात, गोरक्ष घुगे, वैष्णव मुर्तडक, शेखर सोसे, शरद पावबाके, सौरभ कडलग, हर्षल रहाणे, सचिन दिघे, अनिल कांदळकर, विजय पवार, गौरव डोंगरे, अजय फटांगरे, शुभम घुले, शुभम जाधव, शुभम पेंडभाजे, भगवान लहामगे, निखील पापडेजा, रावसाहेब थोरात, भरत कळसकर यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गाडी जाळणे, तोडफोड करणे, महिलांना मारहाण करणे यासह अनेक आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयाने आता जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Bail granted to Congress workers in Sangamner Dhandarphal 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here