Home नाशिक मोठी बातमी! बच्चू कडू यांना २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

मोठी बातमी! बच्चू कडू यांना २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

Bachchu Kadu sentenced to 2 years imprisonment

नाशिक: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रहारचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू  यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे…

२०१७ साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. त्यावेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता.

तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होती. यानंतर आज याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, पोलिसांनी  सध्या आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून त्यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच निकालानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात  जाणार असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे.

Web Title: Bachchu Kadu sentenced to 2 years imprisonment

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here