आयुर्वेदिक डॉक्टरकडून सुरु होता संतापजनक प्रकार, खळबळजनक घटना
Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, एका पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी आणि तिची आई गर्भलिंग निदान करत असल्याचे प्रकरण.
छत्रपती संभाजी नगर: छत्रपती संभाजी नगर मधून खळबळजनक घटना उघडकीस आलीय. शहरातील गारखेडा येथील गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आला. यातून एका पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी आणि तिची आई गर्भलिंग निदान करत असल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हे उध्वस्त केले होते.
त्यावेळी 12 लाख 78 हजार पेक्षा अधिक रक्कम आणि इतर साहित्य मिळून आले होते. मात्र प्रकरणात आता पुन्हा एक धक्कादायक माहिती उघड झालीय. या रॅकेटचे पाळंमुळं आता थेट सिल्लोड पर्यंत पोहोचली आहेत. गर्भपात करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या टोळीचा पोलिसांनी आता पर्दाफाश केलाय. एका आयुर्वेदिक डॉक्टरसह 10 जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. रोशन ढाकरे असं या अवैधरित्या गर्भात करणाऱ्या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: ayurvedic doctor starts with an angry type
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study