Home जळगाव दुचाकीच्या मागील चाकात साडीचा पदर अडकला, अन आईचा अंत

दुचाकीच्या मागील चाकात साडीचा पदर अडकला, अन आईचा अंत

Jamkner Accident: घरी परतत असताना दुचाकीच्या मागील चाकात साडी अडकून आई खाली कोसळल्याने मृत्यू

Accident layer of saree got caught in the rear wheel of the bike, the end of the mother

जामनेर |जळगाव: दुचाकीने जात असताना दुर्दैवी अशा घटनेने महिलेला जीव गमवावा लागला आहे. दुचाकीवरून घरी पहूरकडे जात असताना दुचाकीच्या मागील चाकात साडीचा पदर अडकला. यामुळे महिला मागे खेचली जाऊन खाली पडली. यात या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना संभाजीनगर- जळगाव महामार्गावर घडली.

जामनेर तालुक्यातील पहूर येथील मनीषा कैलास चौधरी (वय ४८) असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. मनीषा चौधरी या त्यांचा मुलगा ऋषिकेश चौधरी याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या होत्या. तेथील काम आटोपल्यानंतर संभाजीनगर येथून पहूर येथे घरी परत येण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफवर सिल्लोड फाट्याजवळील भवन गावाजवळ अपघात घडला.

महामार्गावर एका साईडने दुचाकी चालवत असताना दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषा यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकला. यामुळे त्या ओढल्या जाऊन खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला व पाठीला जबर मार लागल्याने त्यांना तत्काळ सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

आईच्या मृत्यूने मुलगा निशब्द आईला सोबत घेऊन गेल्यानंतर घरी परतत असताना दुचाकीच्या मागील चाकात साडी अडकून आई खाली कोसळल्याचे पाहताच ऋषिकेश भांबावून गेला. मागे बसलेली आई पडल्याचे लक्षात येताच त्याने गाडी उभी करत धाव घेत आईजवळ पोहचला. मात्र आई काहीच हालचाल करत नसल्याचे त्याला जाणवले. काही कळायच्या आतच आईने प्राण सोडले. अन एकच आक्रोश झाला.

Web Title: Accident layer of saree got caught in the rear wheel of the bike, the end of the mother

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here