संगमनेर: अविवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न
Breaking News | Sangamner Crime: दिव्यांग ३७ वर्षीय अविवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न सख्ख्या भावावर गुन्हा.
घारगाव : दिव्यांग ३७ वर्षीय अविवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार बुधवारी (दि.०२) रात्री संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात घडला. अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोघे सख्खे भाऊ आहेत.
वाल्मीक रोहिदास घाणे, अक्षय रोहिदास घाणे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. दिव्यांग अविवाहित महिला तिच्या कुटुंबीयांसमवेत राहते. ती राहत असलेल्या गावातील जुन्या घरी झोपण्यासाठी गेली होती. पाऊस पडून गेल्यानंतर ढगाळ वातावरण असल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता, त्यामुळे अंधार होता. या महिलेचा किंचाळण्याचा आवाज येत असल्याने तिच्या कुटुंबातील सदस्य ताबडतोब जुन्या घराकडे गेले. त्यावेळी वाल्मीक घाणे हा तिच्यावर अत्याचार करणाऱ्या प्रयत्न करत होता, त्याला पकडल्यानंतर त्याने हाताला हिसका देत पळून गेला. त्यावेळी अक्षय घाणे हा कुणी येऊ नये म्हणून बाहेर उभा राहून लक्ष ठेवत होता. त्यानंतर तोही तेथून पळून गेला. असेही फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Attempted physical assault on an unmarried woman