Home अहिल्यानगर अहिल्यानगर: डाव्या कालव्यात पडून बालकाचा मृत्यू

अहिल्यानगर: डाव्या कालव्यात पडून बालकाचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Crime: मोठ्या बहिणी बरोबर खाऊ आणण्यासाठी दुकानात चाललेला लहान मुलगा पाय घसरून मुळा डाव्या कालव्यात पडून मृत्यू.

Child dies after falling into left canal

राहुरी : मोठ्या बहिणी बरोबर खाऊ आणण्यासाठी दुकानात चाललेला लहान मुलगा पाय घसरून मुळा डाव्या कालव्यात पडला. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला पण ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. ही घटना बारागाव नांदूर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. जय नवनाथ पवार (वय ६, रा. बारागाव नांदूर) असे मयत बालकाचे नाव आहे.

जय पवार याचे वडील नवनाथ पवार हे पत्नी दोन मुली व मुलगा यांच्यासह नांदुर परिसरात राहतात. ते मोल मजुरीचे काम करून कुटुंब चालवतात. जय पवार हा दोन बहिणीसमवेत बारागाव नांदूर येथील शाळेत शिकत होता. दुपारी मोठ्या बहिणीबरोबर जय पवार खाऊ आणण्यासाठी दुकानात चालला होता. पाय घसरून तो कालव्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी बहिणीने आरडाओरडा केला. सुभाष नामदेव पवार यांनी पाण्यात उडी मारून जय यास पकडले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

Web Title: Child dies after falling into left canal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here