पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराने केले तरुणीसोबत अश्लील चाळे
Breaking News | Nagpur Crime: आपला न्यूड फोटो पाठवून तरुणीचे न्यूड फोटो पाठविण्याचा आग्रह धरणाऱ्या आणि पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे.
नागपूर : आपला न्यूड फोटो पाठवून तरुणीचे न्यूड फोटो पाठविण्याचा आग्रह धरणाऱ्या आणि पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या अकोला येथील पोलिस निरीक्षकाविरुद्ध नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव पुढे आल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली. धनंजय सायरे (५६, रा. धामनगाव, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तो अकोल्यातील खदान
न्यूड फोटो पाठविण्याचा आग्रह, तिने दिला नकार आरोपी नागपुरात येऊन युवतीला नेहमीच भेटत होता. काही दिवसांपासून त्याने तरुणीला अश्लील मॅसेज पाठविणे सुरू केले. तरुणीने न्यूड फोटो पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तिने नकार दिल्याने तो तरुणीच्या घरी गेला. त्याने तरुणीसोबत जबरदस्तीचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार करताच आरोपीने पिस्तूल तिच्यावर रोखून अश्लील चाळे केले.
पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. पीडित २२ वर्षीय तरुणी अमरावती जिल्ह्यातील आहे. तिचे वडीलही पोलिस खात्यात आहेत. तरुणीचे वडील आणि आरोपी धनंजय सायरे हे एकाच बॅचमध्ये होते. त्यामुळे धनंजयचे तिच्या घरी येणे-जाणे होते. आरोपी धनंजयची तरुणीवर नजर
पडली. पुढे तो खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलिस निरीक्षक झाला. तरुणीला पोलिस अधिकारी व्हायचे असल्यामुळे ती नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. आरोपी सायरे याने तरुणीशी मैत्री केली. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. त्याने तिला आयफोनही भेट दिला.
Web Title: At the point of a pistol, Thanadar sexually assaulted a young woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study