Home नागपूर दोन लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

दोन लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Bribe Case: शेती विक्रीपत्र प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतरही संभधीताना अभय देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Assistant Police Inspector caught in ACB's net while taking bribe of two lakhs

नागपुर: शेती विक्रीपत्र प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतरही संभांधीताना अभय देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास दोन लाखांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे,

प्रेमानंद दादाराव कात्रे, वय 43 व सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे कोराडी, असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांचेविरुधात सुनंदा ठाकरे यांनी संयुक्त मालकीचे मोजा कवठा ता कामठी येथील शेतीचे विक्रीपत्र व फसवणूक केल्याचे तक्रार अर्ज पोलीस ठाणे कोराडी येथे दाखल केला. या प्रकरणात तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करता सेटलमेंट करून देण्यासाठी 2 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळ्यात सदर पोलीस अधिकारी अडकला. लाच रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

आरोपीताची घरझडती देखील करण्यात आली. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. एसीबी पोलीस अधीक्षक, डॉ. दिगंबर प्रधान, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात तपासी अधिकारी प्रिती शेंडे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Assistant Police Inspector caught in ACB’s net while taking bribe of two lakhs

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here