Home अहमदनगर अहमदनगर पोलीस दलात खळबळ: सहायक फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर पोलीस दलात खळबळ: सहायक फौजदाराची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar | Shrigonda Suicide Case: बेलवंडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. 

Assistant Faujdar committed suicide by hanging himself

श्रीगोंदा: जिल्हा पोलीस दलातील एक घटना ताजी असताना जिल्ह्यात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे, पोलीस हवालदार भाऊसाहेब दगडू आघाव यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी असतानाच दसर्‍याच्या दिवशीच बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक फौजदार सुनील धोंडिबा मोरे (54) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्रास दिल्याने हवालदार आघाव यांनी पाच दिवसांपूर्वी बंदूकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल आहे.  ही घटना ताजी असताना फौजदार मोरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागेही वरिष्ठांचा जाच असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

फौजदार मोरे हे श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेजच्याजवळ परिवारासह राहात होते. ते एक ते दीड महिन्यांपासून मेडिकल रजेवर असल्याचे समजले. बेलवंडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून सुनील यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांची पत्नी किर्ती मोरे यांनी केला आहे.

दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहे. फौजदार मोरे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदे पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऐन सणासुदीच्या दिवशी पोलीस अंमलदाराने आत्महत्या केल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे काय निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई करू.

– अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक

Web Title: Assistant Faujdar committed suicide by hanging himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here