शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी लागली; म्हणाले,
Maharashtra Assembly Election 2024: मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
Ajit Pawae vs Sharad Pawar: शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहे. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे, साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं, असं अजित पवारांनी सांगितले. इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले, असं अजित पवार म्हणाले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. (Vidhansabha Election 2024)
शरद पवारांना ज्या उंचीवर देश बघतो, महाराष्ट्र बघतो…त्या मोठ्या नेत्याने माझी नक्कल केलेली अनेकांना पटली नाही. मी रात्र-दिवस एक करुन, सगळीकडे जाऊन निवडणुकीत काम केलं. शरद पवारांनी मुलाप्रमाणे असणाऱ्याची नक्कल केली, हे अनेकांना आवडलेलं नाही. मी रुमाल काढला नव्हता, त्यांनी रुमाल काढला. मी आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. कधी-कधी असं होतं. पण माझं रडणं नैसर्गिकपद्धतीने झालं, असं अजित पवारांनी सांगितले. पण मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी माझी नक्कल केली, याचं खूप वाईट वाटलं, अशा भावना अजित पवारांनी व्यक्त केल्या.
Web Title: Assembly Election Sharad Pawar’s copy fell on Ajit Dad’s heart
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study