5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं, कधी कोठे होणार निवडणूक
मुंबई | India Assembly Election 2022: देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश , पंजाब , उत्तराखंड , गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
पाचही राज्यात एकूण 690 विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकूण 7 टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधासह आणि खबरदारी घेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर पाचही राज्यात 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्रा यांनी माहिती दिली आहे.
कोणत्या राज्यात किती विधानसभा मतदारसंघ?
उत्तर प्रदेश- 403
गोवा- 40
मणिपूर- 60
पंजाब- 117
उत्तराखंड- 70
कोणत्या राज्यात केव्हा होणार मतदान?
यूपीत एकूण 7 टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14,20, 23, 27 फेब्रुवारीला पहिल्या 5 टप्प्यातील मतदान पार पडेल. तर 3 आणि 7 मार्चला अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या टप्प्यासाठी उमदेवाराचं भवितव्य मतपेटीत बंद होईल.
मणिपूरमध्ये केव्हा होणार मतदान?
मणिपुरात एकूण 2 टप्प्यात निवडणूका पार पडणार असून पहिला टप्प्यातील मतदान हे 27 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसरा टप्पातील मतदानप्रक्रिया 3 मार्चला पार पडेल.
तीन राज्यात एकाच टप्प्यात मतदान
पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान होईल.
Web Title: India Assembly Election 2022