संगमनेर: अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या संगमनेरातील आरोपीला ठोकल्या बेड्या
Sangamner News: दोन वर्षानंतर अल्पवयीन मुलीचा शोध, आरोपीला अटक (Arrested) करण्यात आली.
अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले असून, पोलिस पथकाने आरोपीला ठोकल्या आहेत. गणेश भाऊसाहेब चव्हाण (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन वर्षानंतर अल्पवयीन मुलीचा शोध लागला आहे.
गणेश चव्हाण याने १९ मार्च २०२१ रोजी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. मानवी वाहतूक पोलिसांनी
या गुन्ह्याचा तपास लावून आरोपीला गजाआड केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उप पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उप उपअधीक्षक कमलाकर जाधव, पोलिस उपअधीक्षक (गृह) हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. बाळासाहेब शिंदे, मपोसई. प्रियांका आठरे, पोहेकॉ. समीर सय्यद, मपोहेकॉ. अनिता पवार, मपोकॉ. छाया रांधवन, पोकॉ. काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Arrested in Sangamner, who abducted a minor girl, was put in chains
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App