Home अहमदनगर सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीतून शेतकरी मृत्युप्रकरणी अटक

सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीतून शेतकरी मृत्युप्रकरणी अटक

Shrirampur News: पोलिसांनी सुरक्षारक्षक दशरथ पुजारी यांना अटक (Arrested) करून गुन्हा दाखल.

Arrested in connection with the death of a farmer due to a bullet fired 

श्रीरामपूर: अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाकडून बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर टाऊन शाखेत सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी यांच्या बंदुकीचा चाप हा त्यांच्या बेल्टमध्ये अडकल्याने तो चाप सुटून बंदुकीची गोळी बँकेच्या कामकाजासाठी आलेल्या श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7, सार्वमत रोडवर राहणारे शेतकरी अजित विजय जोशी (वय 50) यांच्या डोक्यात आरपार गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सुरक्षारक्षक दशरथ पुजारी यांना अटक करून त्यांचेविरुद्ध भादंवि कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे करत आहेत.

Web Title: Arrested in connection with the death of a farmer due to a bullet fired 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here