अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड
Breaking News | Ahilyanagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड.
शेवगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. संबंधित आरोपीच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात २६ सप्टेंबर २०२४ रोजी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून तो आरोपी फरार होता.
संदीप माणिक सरसे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडितेच्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास संदीप माणिक
सरसे याने मोबाइलवरून पीडितेस फोनवर मेसेज केला. तुला भेटायचे आहे, असे सांगून रात्री सव्वादहाच्या सुमारास पीडितेच्या घराच्या काही अंतरावरील समाजमंदिराच्या आवारात भेटण्यासाठी बोलावून घेतले. यावेळी आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला होता. यादरम्यान त्याने वास्तव्याचे ठिकाण बदलून नाशिक, पुणे, सातारा, सांगली, गुजरात येथे राहत होता. शेवगावचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना हा आरोपी सुपा (ता. पारनेर) येथून जाणार असल्याची माहिती मिळाली.
Web Title: Arrested A man who raped a minor girl