संगमनेर: अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना अटक
Breaking News | Sangamner: अर्बन बँकेच्या 261 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरण; अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना अटक, राजकीय, व्यापारी क्षेत्रासह सहकार क्षेत्रात खळबळ.
संगमनेर: अहमदनगर येथील अर्बन बँकेच्या 261 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची नाळ संगमनेर तालुक्यातील अमित पंडित यांच्याशी जोडली गेल्याने संगमनेर शहर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याच घरात लपून बसलेल्या पंडितला अटक केल्यामुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे,
अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सरुवातीला शाखाधिकारी मुकेश जगन्नाथ कोरडे, प्रदीप जगन्नाथ पाटील यांना अटक झाली. नंतर माजी संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदूलाल कोठारी, माजी अशोक कटारिया यांनाही आणि त्याहीनंतर सीए व माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी, मनोज फिरोदिया, प्रवीण लहारे यांना अटक झाली. आता कर्जदार अमोल वैकर याला अटक केली. याप्रकरणी आज अमित पंडित यांना अटक करण्यात आली आहे.
अमृत वाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक केल्याने संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रासह उद्योजकांमध्येही खळबळ उडाली आहे. 110 वर्षांची परंपरा असलेली अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या बँकेच्या घोटाळ्यात संगमनेरचे अमित पंडित यांच्या मागे पोलीस अनेक दिवसांपासून होते. अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांना अटक करण्याचे आदेश दिले असल्याने संगमनेर शहर पोलीस त्यांचा मागोवा घेत होते. मात्र पंडित कुठेही मिळून आला नाही.
शनिवारी (दि 16) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंडितच्या घरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, आणि हरिश्चंद्र बांडे यांच्या पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता ते कुठेही मिळून आले नाही. मात्र त्यांच्या बेडरूममध्ये पोलिसांनी झडती घेतली असता दडून बसलेला अमित पंडित सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रासह व्यापारी तसेच सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Web Title: Arban Bank Scam Amit Pandit, former chairman of Amritvahini Bank, arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study